शाहरुख खानच्या कन्येचे विधान
सुपरस्टार शाहरुख खानची कन्या सुहाना सोशल मीडिया स्टार आहे. सुहानाची फॅन फॉलोइंग लाखोंमध्ये आहे. अशा स्थितीत सुहाना चाहत्यांसोबत स्वतःच्या वैयक्तिक आयुष्याशी निगडित घडामोडी तसेच स्वतःची छायाचित्रे शेअर करत असते. आता सुहानाने स्वतःला कॅट लेडी म्हणवून घेतले आहे. तिने एक नवे छायाचित्र शेअर करत उपमा स्वतःला चिकटविली आहे.
21 वर्षीय सुहानाच्या या छायाचित्राला चाहते पसंत करत आहेत. आलिया भट्टने देखील या छायाचित्राला लाइक केले आहे. आलिया स्वतः एक मांजरप्रेमी आहे. तर सुहानाची मैत्रिण शनाया कपूर आणि अनन्या पांडे यांच्या आई महीप कपूर तसेच भावना पांडे यांनी या छायाचित्रावर कमेंट करत हार्ट इमोजी शेअर केला आहे.
केवळ तुच एक ‘कूल कॅट लेडी’ आहेस असे सुहानाची चुलत बहिण आलिया छिब्बाने नमूद केले आहे. चाहत्यांकडूनही सुहानाच्या या छायाचित्रावर अनेक प्रकारच्या प्रतिक्रिया प्राप्त होत आहेत.
सुहाना खान न्यूयॉर्कच्या विद्यापीठातून अभिनयाचे धडे गिरवत आहे. शाहरुख खानप्रमाणेच ती कलाकार होण्याची इच्छा बाळगून आहे. सुहानाने काही वर्षांपर्यंत अभिनय शिकून घ्यावा आणि स्वतःचे शिक्षण पूर्ण केल्यावर चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवावे असे शाहरुखने यापूर्वी म्हटले होते.