ऑनलाईन टीम / मुंबई :
महाराष्ट्रातील हॉट स्पॉट असलेल्या मुंबई शहरात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या आता कमी होत चालली आहे. तसेच कोरोना रुग्णांच्या मृत्यूच्या आकड्यातही घट होताना पाहायला मिळत आहे. केवळ मुंबईतच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात येताना दिसत आहे.
- मुंबईत 581 नवे रुग्ण; 3 जणांचा मृत्यू
दरम्यान, राज्यात काल 3 हजार 282 कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर 35 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. विशेष बाब म्हणजे मुंबईत आज फक्त 581 कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर केवळ 3 जणांचा मृत्यू झाला आहे.
- मुंबईत मार्चनंतर प्रथमच सर्वात कमी मृत्यूंची नोंद
मार्च-एप्रिल या कोरोनाच्या महिन्यानंतर मुंबईत प्रथमच सर्वात कमी मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे मुंबईकरांना काहीसा दिलासा मिळाला आहे.दरम्यान मुंबईत सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत आहे. झोपडपट्टयांतील कंटेन्मेंट झोनची आणि सीलबंद इमारतीची संख्या देखील कमी करण्यात आली आहे. झोपडपट्टया आणि चाळीतील कंटेन्मेंट झोनची संख्या 283 वरून 221 एवढी झाली आहे. तर सीलबंद इमारतीची संख्या 2,462 वरून 2090 एवढी झाली आहे.
तसेच, कोरोनामुळे रविवारी केवळ 3 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे मृतांच्या संख्येत 4 ने घट झाली आहे. तर कोरोनामुळे आतापर्यंत मृत्यू झालेल्या रुग्णांची एकूण संख्या 11 हजार 132 वरून 11,135 एवढी झाली आहे.
तर कालच्या एका दिवसात 11,170 चाचण्या करण्यात आल्या त्यामुळे एकूण चाचण्यांची संख्या आता 24 लाख 93 हजार 590 एवढी झाली आहे.