मुंबई/प्रतिनिधी
राज्य सरकारकडून मुंबईकरांना नववर्षाचं गिफ्ट देण्यात आलंय. नगरविकास खात्याची बैठक झाली. यावेळी या बैसठकीत मोठा निर्णय घेण्यात आला. या बैठकीत ५०० स्केवर फूटांपर्यंत घरांना करमाफी करण्यात आली आहे. नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी यासंदर्भात घोषणा केली. यावेळी मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर ऑनलाईन उपस्थित होत्या.
नव्या वर्षात महाविकास आघाडी सरकारने मुंबईकरांसाठी मोठी भेट दिली आहे. नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईतील 500 स्क्वेयर फुटांच्या घरांना मालमत्ता कर माफ केला आहे. खरतर शिवसेने ने आपल्या निवडणुकीच्या जाहीरनाम्यात मुंबईकरांसाठी ही घोषणा केली होती. त्यानंतर मुंबई महापालिकेत या प्रस्तावाला मंजूर मिळाल्यानंतर हा प्रस्ताव राज्यसरकारकडे पडून होता. नगरविकास विभागाची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली. यावेळी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी ही घोषणा केली आहे.
मुंबईतील ५०० चाैरस फुटांच्या घरांना मालमत्ता करात माफी दिल्यामुळे आता महापालिकेचा दरवर्षी ३४० कोटींचा कर बुडणार आहे. मुंबईमध्ये ५०० चाैरस फुटांचे जवळपास १५ लाख घरे आहेत. यामध्ये २८ लाख कुटुंब राहतात. या सगळ्या कुटुंबियांना मोठा दिलासा सरकारकडून मिळाला आहे.