मुंबई \ ऑनलाईन टीम
मुंबईतील अंधेरी भागात चार मजली इमारत कोसळल्याची घटना समोर आली आहे. मंगळवारी रात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली असल्याचे सांगितले जात आहे. या दुर्घटनेत ५ जण जखमी झाले असून या जखमींवर रुग्णालयात उपचार सुरु आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईत बांधकाम सुरु असणारी ४ मजली इमारत समोरच्या ३ घरांवर कोसळली. इमारत कोसळलेल्या ढिगाऱ्याखाली ५ जण अडकले होते. ही माहिती मिळताच अग्रिशमन दलाच्या अधिकारी-जवानांनी घटनास्थळी धाव घेतली आणि ४ तासांत अडकलेल्या लोकांना रेस्क्यू केले.या पाच जखमींना जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
मात्र या सर्व घरांचे ढिगारा मुंबई अग्निशमन दलाचे जवान आणि मुंबई महानगर पालिकेच्या जवान काढण्याचे प्रयत्न करत आहेत. सध्या या परिसरात मोठ्या प्रमाणात वन प्लस थ्री असं मिळून चार मजल्यांच्या अनधिकृत घर असल्यामुळे सर्वांच्याच मनामध्ये भीती पसरली आहे. सुदैवाने या घटनेत कुठलीही जीवित हानी झाली नाही.