- अनेक लसीकरण केंद्र लसीअभवी बंद
ऑनलाईन टीम / मुंबई :
मुंबईत फक्त एक दिवसाचा लसीचा साठा शिल्लक असल्याची माहिती मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिली आहे.
त्या म्हणाल्या, मुंबईतील अनेक केंद्रावर लसींचा साठा शून्यावर आल्याने अनेक ठिकाणी लसीकरण बंदच आहे. आपल्याकडे अत्यंत अल्प साठा आहे. आपल्याला 76 हजार ते एक लाख लस येत असल्याची माहिती मला माध्यमांकडून मिळाली. पण याबाबत अजून अधिकृत माहिती नाही. ह्या लस देखील अपुरी पडणार आहेत. कारण दुसरा डोस घेणाऱ्यांचीच इतकी मोठी रांग आहे.
दरम्यान, लस नसल्याने बीकेसी, मुलुंडमध्ये लसीसकरण बंद झाली असल्याने येथील आरोग्य कर्मचाऱ्यांना नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे. दरम्यान लसीकरणासाठी केंद्रांवर होणाऱ्या गर्दीवरुन त्यांनी चिंता व्यक्त केली आहे.
तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी याविषयी गंभीर आणि सक्रीय आहेत. पण त्यांच्या हाताखाली काम करणारे लोक त्याच गांभीर्याने याकडे पाहत नसल्याचे दिसत आहे, अशी टीका यावेळी त्यांनी केली.
- डोस उपलब्ध नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी
तर दुसरीकडे, मुंबईतील सर्वात मोठ कोविड लसीकरण केंद्रही बंद झाले आहे. बीकेसीमधले जम्बो कोविड लसीकरण केंद्र लसीच्या पुरवठ्याअभावी बंद झाले आहे. सकाळपासून रांगेत उभ्या असलेल्या लोकांना बाहेर येऊन परत जाण्याची विनंती करण्याची वेळ डॉक्टर आणि पोलिसांवर आली आहे.