ऑनलाईन टीम / मुंबई :
मुंबईतील क्रॉफर्ड मार्केट जवळ एका वेगवान कार ने 8 जणांना चिरडल्याची घटना समोर आली आहे. या अपघातात चार जणांचा मृत्यू झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार हा अपघात काल रात्री 9 वाजताच्या सुमारास क्रॉफर्ड मार्केटजवळ काल (सोमवार 31 ऑगस्ट) घडला. भरधाव एस्टीम कारने क्रॉफर्ड मार्केटसमोरुन येऊन पुलाखालून मेन रोड क्रॉस केला. गाडीने हॉटेल जनता कॅफेला जोरदार धडक दिली. यावेळी रस्त्यावर आणि हॉटेलच्या समोर उभे असलेले अनेक जण जखमी झाले.
जखमी झालेल्या 8 जणांना जवळच्या जेजे रुग्णालयात नेण्यात आले. मात्र 5 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. इतर चार गंभीर जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.
अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनस्थळी पोहचून जखमींना रुग्णालयात दाखल केले. अपघाताचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट आहे. याबाबत पोलिस तपास करत आहेत.