ऑनलाईन टीम / मुंबई :
मुंबई महापालिका क्षेत्रात आज कालच्या तुलनेत नव्या रुग्णसंख्येत किंचितशी घट झाली. तर मुत्यूंची संख्या तुलनेने किंचित वाढली. मागील 24 तासात 540 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. काल ही संख्या 664 इतकी होती. तर, दिवसभरात 628 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. कालच्या तुलनेत बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या कमी आहे. काल ही संख्या 744 इतकी होती.
दरम्यान, गेल्या 24 तासांत मुंबईत कोरोनाने 13 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. काल ही संख्या 9 इतकी होती. या सोबतच, मुंबईत आतापर्यंत एकूण 7 लाख 1 हजार 198 रुग्ण बरे झाले असून आतापर्यंत एकूण 15,586 रुग्णांनी आपला जीव गमावला आहे. सध्या मुंबईत रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 96 टक्के इतके असून कोविड रुग्णवाढीचा दर 0.08 टक्के इतका खाली आला आहे. तर रुग्ण दुप्पटीचा कालावधी आता 858 दिवसांवर जाऊन पोहचला आहे.
मुंबईत आज एकूण 37 हजार 802 कोविड चाचण्या करण्यात आल्या असल्याचे मुंबई महानगरपालिकेने सांगितले आहे. सध्या झोपडपट्टी व चाळींमध्ये 11 सक्रिय कंटेनमेंट झोन असून एकूण 67 इमारती सील करण्यात आल्या आहेत.