ऑनलाईन टीम / मुंबई :
देशात कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे आता केंद्र सरकारने अखेर मुंबईमध्ये रॅपिड टेस्टला परवानगी दिली आहे. त्यामुळे आता मुंबई महापालिकेने रॅपिड टेस्टसाठी हालचाली सुरू केल्या आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार फक्त केंद्राकडून मिळणाऱ्या किट्स वर अवलंबून न राहता मुंबई महापालिका दक्षिण कोरिया कडून विकत घेतले आहेत. या रॅपिड टेस्टमुळे एखाद्या व्यक्तीला संसर्ग झाला आहे की नाही हे तत्काळ कळू शकणार आहे.
त्यामुळे या टेस्ट मध्ये व्यक्तीला संसर्ग झाला असल्याचे आढळल्यास त्याची कोरोनाची चाचणी केली जाणार आहे. त्यामुळे आता अनेकांना कोरोनाची लागण होण्यापूर्वीच वाचवता येणार आहे.
दरम्यान, महाराष्ट्रात कोरोनाबाधितांचा आकडा हजारच्या वर पोहचला आहे. एकट्या मुंबईत हा आकडा 714 असून 40 पेक्षा अधिक नागरिकांचा मृत्यू झाला आहे.