ऑनलाईन टीम / मुंबई :
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आयआयटी मुंबईकडून मोठा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयानुसार मुंबई आयआयटीचे वर्ग आता ऑनलाईन भरले जाणार आहेत.
या निर्णयानुसार, आता विद्यार्थ्यांचे फेस टू फेस लेक्चर वर्षभरासाठी थांबवण्यात आले आहेत. असा निर्णय घेणारी मुंबई आयआयटी ही पहिलीच संस्था आहे.
मुंबई आयआयटीच्या सुभाशिष चौधरी यांनी सांगितले की, आगामी सेमीस्टर पर्यंत आता फक्त ऑनलाईन वर्गच चालवण्यात येतील. त्यामुळे सर्व विद्यार्थी कोरोना व्हायरस पासून सुरक्षित राहतील. विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन वर्गांची रूपरेषा तयार केले जात आहे. याबाबत लवकरच विद्यार्थ्यांना माहिती दिली जाईल.