ऑनलाईन टीम / मुंबई :
मुंबईत एका अभिनेत्रीने इंटेरिअर डिझायनिंग करणाऱ्या व्यक्तिवर छेडछाडीचे आरोप केले आहेत. अभिनेत्रीच्या या आरोपांनंतर पोलिसांनी त्या व्यक्तिविरोधात गुन्हा दाखल केला आहे. मुंबईतील ओशीवारा पोलिस स्थानकात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर पोलिस आता त्या इंटेरिअर डिझायनरचा शोध घेत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, हे प्रकरण मागील म्हणजेच जुलै (2021) महिन्यातील आहे. या अभिनेत्रीने साऊथ चित्रपटांमध्ये अधिक काम केले आहे. तर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 35 वर्षीय अभिनेत्री वीरा देसाईने अंधेरोमध्ये स्वतः चे नवे घर खरेदी केले होते. तर घराचे इंटेरिअर डिझायनिंग करण्यासाठी तिने कॉन्ट्रॅक्ट दिले होते.
अभिनेत्रीने आपल्या तक्रारीमध्ये सांगितले आहे की, काम दिल्यानंतर मागील महिन्यात ती घराचे काम पाहण्यासाठी आली होती. मात्र त्याने केलेले काम तिला न आवडल्याने तिने हे कॉन्ट्रॅक्ट संपवायला सांगितले होते.
पुढे अभिनेत्रीने सांगितले की, त्या डिझायनरने तिला अपशब्द बोलायला सुरूवात केली. तर तिला तिच्याच घरातून बाहेर काढले. तर तिने असेही सांगितले की, तिला त्या व्यक्तिने पोलिसांत जाण्याची धमकी दिली होती. त्यामुळेच तक्रार दाखल करण्यासाठी उशीर झाला आहे.
- पोलिसांकडून तपास सुरू
दरम्यान या प्रकरणी आता पोलिस आता त्या इंटेरिअर डिझायनरचा शोध घेत आहेत. ओशिवारा पोलीस स्थानकात अभिनेत्री अभिनेत्रीच्या तक्रारीनंतर आईपीसी कलम 354, 504, 509 या नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच पोलीस आता या प्रकरणाचा तापस करत आहेत.