मुंबई /वृत्तसंस्था
भारतीय संघातील माजी यष्टीरक्षक व मुंबई इंडियन्स प्रँचायझीचे टॅलेंट स्काऊट किरण मोरे यांना कोरोनाची लागण झाली असल्याचे मंगळवारी या आयपीएल प्रँचायझीने घोषित केले. 58 वर्षीय किरण मोरे पाचवेळा आयपीएल स्पर्धा जिंकणाऱया मुंबई इंडियन्स संघासाठी यष्टीरक्षण सल्लागार म्हणून काम पाहतात.
‘कोरोनाचा पॉझिटिव्ह अहवाल आल्यानंतर किरण मोरे आता आयसोलेट आहेत आणि बीसीसीआयच्या वैद्यकीय दिशानिर्देशाचे पालन करत आहेत. मुंबई इंडियन्सचे वैद्यकीय पथक मोरे यांच्या तब्येतीची काळजी घेत आहे. लवकरच ते यातून सावरतील’, असा विश्वास मुंबई इंडियन्स प्रँचायझीने यावेळी व्यक्त केला.
यंदा आयपीएलमध्ये सहभागी होणाऱया खेळाडू व साहायक पथकातील काही सदस्यांना कोरोनाची बाधा झाली असून दिल्ली कॅपिटल्सचा अष्टपैलू अक्षर पटेलचा त्यात प्राधान्याने समावेश आहे. सध्या अक्षर पटेलही आयसोलेट आहे. रॉयल चॅलेंजर्स बेंगळूरचा सलामीवीर देवदत्त पडिक्कल सध्या होम क्वारन्टाईन आहे. दोनच दिवसांपूर्वी त्याचा कोरोना अहवाल निगेटिव्ह आला आहे.