वृत्तसंस्था/ मुंबई
2021 आयपीएल क्रिकेट स्पर्धेसाठी विद्यमान विजेत्या मुंबई इंडियन्स संघातील खेळाडूंसाठी नवी जर्सी उपलब्ध करून देण्यात आली आहे. या आकर्षक जर्सैचे अनावरण शनिवारी येथे करण्यात आले.
मुंबई इंडियन्स आतापर्यंत पाचवेळा आयपीएल स्पर्धा जिंकली आहे. 2021 च्या आयपीएल क्रिकेट स्पर्धेसाठी या संघाच्या फ्रँच्यायजीने आपल्या खेळाडूंसाठी नवी आकर्षक रंगाची जर्सी उपलब्ध करून दिली आहे. या जर्सीवर निसर्गातील पृथ्वी, जल, अग्नि, वायू आणि आकाश या पंचमहाभूतांचे महत्त्व दाखविणारे चित्रे रेखाडण्यात आली आहेत. आयपीएल क्रिकेट स्पर्धेला 9 एप्रिलपासून प्रारंभ होत असून विद्यमान विजेता मुंबई इंडियन्स आणि रॉयल चँलेंजर्स बेंगळूर यांच्यात सलामीचा सामना होणार आहे.