प्रतिनिधी / कोल्हापूर
कोल्हापूरचे सुपुत्र भूषण देशपांडे यांची मुंबई उपनगरचे जिल्हा नियोजन अधिकारी म्हणून नियुक्त करण्यात आली आहे. शुक्रवारी रात्री राज्य शासनाने या संदर्भात आदेश काढले. अर्थ व सांख्यिकी संचालनालयाच्या मुंबईतील मुख्य कार्यालयात देशपांडे उपसंचालकपदी (प्रशासन) कार्यरत होते. त्यांना आता मुंबई उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन समितीची जबाबदारी देण्यात आली आहे. जिल्हा नियोजन अधिकारी म्हणून त्यांनी सूत्रे स्वीकारली.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निवासस्थान मातोश्री हे बांद्रÎात आहे. मुंबई उपनगर जिल्हÎात बांद्रा आहे. या जिल्हÎाचे पालकमंत्री आदित्य ठाकरे आहेत. देशपांडे यांना मुख्यमंत्र्यांच्या जिल्हÎात काम करण्याची संधी लाभली आहे. देशपांडे यांनी याआधी कोल्हापूरचे जिल्हा सांख्यिकी अधिकारी म्हणून जबाबदारी पार पाडली आहे.