ऑनलाईन टीम / मुंबई :
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते मंत्रालयाच्या प्रांगणात ध्वजारोहण संपन्न झाले. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्यासह विशेष आमंत्रित कोविड योद्धे, डॉक्टर, नर्सेस उपस्थित होते.
यावेळी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना म्हटले की, डॉक्टर्स, नर्सेस, वैद्यकीय आणि पोलिस यंत्रणेत काम करणारे कर्मचारी, स्वच्छता दूत हे खरे कोविड योद्धे आहेत.
पुढे ते म्हणाले, खेड्यापाड्यापर्यंत आरोग्य सेवा पुरवली जाईल आणि सरकार म्हणून शेतकरी आणि कामगारांचे हिताला प्राधान्य दिले जाईल, असेही त्यांनी यावेळी व्यक्त केले.
ध्वजारोहण झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी कोविड योद्धे, डॉक्टर्स, नर्सेस, वैद्यकीय सहायक तसेच कोरोनावर मात केलेल्या नागरिकांना भेटून त्यांचे कौतुक केले.
यावेळी मुख्य सचिव, पोलीस महासंचालक आणि उच्च स्तरीय अधिकारी, माजी राज्यमंत्री दीपक केसरकर आदी उपस्थित होते.