ऑनलाईन टीम / माणगाव :
मुंबई-गोवा महामार्गावर माणगावजवळ आज पहाटे साडेपाच वाजण्याच्या सुमारास एसटी बस पुलावरुन कोसळून भीषण अपघात झाला. या अपघातात 22 प्रवाशी जखमी झाले आहेत. जखमींना तात्काळ जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, अपघातग्रस्त बस मुंबईहून दापोलीकडे जात होती. दरम्यान, मुंबई-गोवा महामार्गावरील माणगावजवळ पहाटे बसचालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याने बस कळमजे पुलावरुन खाली कोसळली. या बसमधून 44 प्रवाशी प्रवास करत होते. या अपघातात 22 प्रवासी जखमी झाले आहेत. त्यामध्ये दोघांची प्रकृती गंभीर आहे. त्यांच्यावर माणगावच्या उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.