बहुप्रतीक्षित मेडिकल ड्रामा ‘मुंबई डायरीज 26/11’ अमेझॉन प्राइम व्हिडिओवर प्रदर्शित झाला आहे. मनोरंजक कथानकाने भरलेल्या या सीरिजची सुरुवात एका सरकारी रुग्णालयात होते आणि 26/11 च्या हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर तयार हेते. हा शो डॉक्टर, नर्स, वॉर्डबॉय इत्यादी प्रथम वैद्यकीय प्रतिसादकर्त्यांची काल्पनिक कथा मांडणारा आहे.
‘मुंबई डायरीज 26/11 या वेब सीरिजमध्ये पॉवरहाउस अभिनेता मोहित रैना आणि कोंकणा सेन शर्मा यांच्यासह अनेक लोकप्रिय कलाकार आहेत. प्रशिक्षणार्थी डॉक्टरांची भूमिका सत्यजीत दुबे, मृण्मयी देशपांडे, नताशा भारद्वाज, श्रेया धन्वंतरी, टीना देसाई, प्रकाश बेलावाडी यांनी साकारली आहे.
रील आणि रियलचा योग्य मिलाप घडवून आणणे हा दिग्दर्शक निखिल अडवाणीचा ट्रेडमार्क आहे. 26/11 शी संबंधित डॉक्टर आणि प्रंटलाइन योद्धय़ांच्या दृष्टीकोनातून तयार करण्यात आलेली ही वेबसीरिज लोकांना आवडणार आहे.