- पत्नी सायरा बानो यांचे चाहत्यांना आवाहन
ऑनलाईन टीम / मुंबई :
बॉलिवूडमधील सर्वात लोकप्रिय कपल म्हणजे, दिलीप कुमार आणि सायरा बानो. 97 वर्षीय दिलीप कुमार यांच्या तब्येतीबाबत सायरा बानो यांनी मोठे वक्तव्य केले आहे.
दिलीप कुमार यांच्या पत्नी सायरा बानो यांनी सांगितले आहे की, दिलीप कुमार थकले आहेत. तसेच त्यांची रोगप्रतिकारक शक्तीही कमी झाली आहे. एवढंच नाहीतर सायरा बानो यांनी सर्वांना दिलीप कुमार यांच्यासाठी प्रार्थना करा, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले आहे.
एका मुलाखतीत बोलताना सायरा बानो म्हणाल्या की, त्या दिलीप कुमार यांची काळजी कोणत्याही दबावापोटी घेत नाहीत, तर त्यांचे दिलीप कुमार यांच्यावर प्रेम आहे. त्यामुळे त्या त्यांची खूप काळजी घेतात. त्या पुढे बोलताना हेदेखील म्हणाल्या की, लोकांनी माझे कौतुक करावे, यासाठी त्यांची काळजी घेत नाही. तर त्यांच्या सहवासात राहणे हे माझ्यासाठी सर्वात प्रिय गोष्ट आहे. माझे त्यांच्यावर खूप प्रेम आहे आणि ते माझा श्वास आहेत.
दरम्यान, दिलीप कुमार आणि सायरा बानो यांच्या लग्नाला 54 वर्ष पूर्ण झाली आहेत. दिलीप कुमार यांचे खरे नाव मुहम्मद यूसुफ खान आहे. त्यांनी 1944 मध्ये आलेला चित्रपट ‘ज्वार भट्टा’मधून चित्रपटसृष्टीत पदार्पण केले होते. चित्रपट सृष्टीत पदार्पण केल्यानंतर त्यांनी आपले नाव बदलले.