ऑनलाईन टीम / मुंबई :
राज्यात सुरू असणारा रेमडिसिवीरचा काळाबाजार थांबण्याचे नाव घेत नाही आहे. मुंबईत बेकायदेशीर साठा केलेले 2,200 रेमडेसिवीर इंजेक्शन मुंबई पोलिसांकडून काल रात्री उशिरा जप्त करण्यात आले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई पोलीस आणि एफडीए यांच्याकडून ही संयुक्त कारवाई करण्यात आली. अंधेरीतीळ मरोल आणि मरीन लाईन्स परिसरात छापा टाकला. मरोळ परिसरातून रेमडिसिव्हरच्या 2000 व्हाईल्स जप्त करण्यात आल्या. तर न्यू मरीन्स लाइन्स येथेही एका वितरकाशी संबंधित ठिकाणीही छापा मारला. तेथून रेमडिसिवीर इंजेक्शनच्या 200 व्हायल जप्त केल्या आहेत. रेमडिसिवीर इंजेक्शनची परस्पर विक्री करण्यावर बंदी असताना, काही वितरकांनी त्याचा साठा करून ठेवला होता.
याबाबत माहिती देताना मुंबई पोलीस म्हणाले, अंधेरीतीळ मरोल आणि मरीन लाईन्स परिसरात मारलेल्या छाप्यातून 2,200 व्हाईल्स जप्त करण्यात आल्या आहेत. या सर्व व्हाईल्स एफडीएकडे सोपवण्यात आल्या असून त्या योग्य त्या ठिकाणी हॉस्पिटलला दिल्या जातील, असेही त्यांनी यावेळी सांगितले.