ऑनलाईन टीम / मुंबई :
मुंबईतील फोर्ट भागातील एक्सचेंज बिल्डिंगमध्ये सोमवारी भीषण आग लागली असल्याची घटना समोर येत आहे. घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी अग्निशमन दलाच्या गाड्या पोहचल्या असून आग विझवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, बलार्ड इस्टेट इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर ही आग लागली आहे. याच इमारतीत एनसीबीचे ऑफिस देखील आहे.
दरम्यान, सध्या एनसीबी रिया चक्रवर्ती ड्रग्ज प्रकरणाची चौकशी करत आहे. एनसीबीचे ऑफिस याच बिल्डिंग मध्ये तिसऱ्या मजल्यावर आहे. घटनास्थळी अग्निशमन दलाच्या गाड्या पोहोचल्या असून आग नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न करत आहेत. अजून तरी ही आग कशामुळे लागली याची माहिती मिळाली नाही. तसेच या आगीत किती नुकसान झाले याबाबतही काही समजलेले नाही. घटनास्थळी मुंबई पोलीस देखील पोहोचले आहेत.