9 एप्रिलला प्रारंभ, 30 मे रोजी अंतिम लढत
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
या वर्षीची आयपीएल स्पर्धा 9 एप्रिलपासून सुरू होणार असून 30 मेपर्यंत ती सहा विविध केंद्रांवर घेतली जाणार आहे. मात्र कोणत्याही संघाला घरच्या मैदानावर खेळण्याची संधी मिळणार नसल्याचे आयपीएल गव्हर्निंग कौन्सिलने रविवारी स्पर्धेचे वेळापत्रक जाहीर करताना सांगितले.
महाराष्ट्रात कोव्हिड 19 रुग्णांच्या संख्येत मोठय़ा प्रमाणात वाढ झाली असली तरी मुंबईचीही सहा केंद्रांमध्ये निवड करण्यात आली आहे. स्पर्धेच्या प्रारंभीच्या टप्प्यात तरी सामने प्रेक्षकांशिवाय खेळविण्यात येणार असल्याचेही स्पष्ट करण्यात आले. मुंबई व्यतिरिक्त अहमदाबाद, बेंगळूर, चेन्नई, दिल्ली व कोलकाता या अन्य केंद्रांवर सामने खेळविले जाणार आहेत. अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर 30 मे रोजी अंतिम सामना आणि त्याआधी प्लेऑफ लढती होणार आहेत.
रविवारी बीसीसीआयने या स्पर्धेचे वेळापत्रक जाहीर केले. त्यानुसार विद्यमान विजेत्या मुंबई इंडियन्सची सलामीची लढत रॉयल चॅलेंजर्स बेंगळूरविरुद्ध 9 एप्रिल रोजी चेन्नईत होईल. 6 मे पर्यंतच्या टप्प्यात एकूण 33 सामने होणार असून त्यातील एकही सामना कोलकात्यात घेतला जाणार नाही. प.बंगालमध्ये आठ टप्प्यात विधानसभा निवडणूक होणार असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. लीग टप्प्यात प्रत्येक संघाला चार केंद्रांवर खेळावयास मिळणार आहे. लीग टप्प्यात एकूण 56 सामने होणार असून चेन्नई, मुंबई, कोलकाता, बेंगळूर येथे प्रत्येकी 10 सामने होणार आहेत तर अहमदाबाद व दिल्ली येथे प्रत्येकी आठ सामने खेळविण्यात येतील.
‘यावेळच्या आयपीएलचे वैशिष्टय़ म्हणजे सर्व सामने त्रयस्थ ठिकाणी खेळविण्यात येणार आहेत. त्यामुळे कोणत्याही संघाला त्यांच्या घरच्या मैदानावर खेळावयास मिळणार नाही. साखळी फेरीतील टप्प्यात प्रत्येक संघ सहापैकी चार केंद्रांवर सामने खेळणार आहे,’ असे आयपीएलने सांगितले. एकूण 11 दिवशी दोन सामने खेळविले जाणार असून सहा संघांना दुपारचे तीन सामने तर दोन संघांना दुपारचे दोन सामने खेळावयास मिळणार आहेत. दुपारी खेळविण्यात येणाऱया सामन्यांची सुरुवात 3.30 वाजता होईल तर संध्याकाळचे सामने 7.30 वाजता सुरू केले जाणार आहेत.
‘प्रत्येक संघाला फक्त तीन वेळाच प्रवास करावा लागेल, अशा पद्धतीने लीग टप्प्यातील सामन्यांचे वेळापत्रक तयार करण्यात आले आहे. प्रवास कमी झाल्याने कोव्हिडचा धोकाही टाळला जाईल. याशिवाय बंदिस्त स्टेडियममध्ये प्रेक्षकांशिवाय सामने खेळविण्यात येणार असून नंतरच्या टप्प्यात त्यांना प्रवेश देण्याबाबत विचारविनिमय करून निर्णय घेतला जाईल,’ असे आयपीएलने दिलेल्या निवेदनात पुढे म्हटले आहे. भारतातील कोरोना महामारीच्या काळातही आयपीएलची याआधीची आवृत्ती संयुक्त अरब अमिरातमध्ये खेळविण्यात आली होती. त्यानंतर भारतातील स्थितीत बरीचशी सुधारणा झाली आहे.
आयपीएल 2021 वेळापत्रक
दिनांक सामना वेळ केंद्र
9 एप्रिल मुंबई वि. बेंगळूर सायं 7.30 चेन्नई
10 एप्रिल चेन्नई वि. दिल्ली सायं. 7.30 मुंबई
11 एप्रिल हैदराबाद वि. केकेआर सायं. 7.30 चेन्नई
12 एप्रिल राजस्थान वि. पंजाब सायं. 7.30 मुंबई
13 एप्रिल केकेआर वि. मुंबई सायं. 7.30 चेन्नई
14 एप्रिल हैदराबाद वि. बेंगळूर सायं. 7.30 चेन्नई
15 एप्रिल राजस्थान वि. दिल्ली सायं. 7.30 मुंबई
16 एप्रिल पंजाब वि. चेन्नई सायं. 7.30 मुंबई
17 एप्रिल मुंबई वि. हैदराबाद सायं. 7.30 चेन्नई
18 एप्रिल बेंगळूर वि. केकेआर दुपारी 3.30 चेन्नई
दिल्ली वि. पंजाब सायं. 7.30 मुंबई
19 एप्रिल चेन्नई वि. राजस्थान सायं. 7.30 मुंबई
20 एप्रिल दिल्ली वि. मुंबई सायं. 7.30 चेन्नई
21 एप्रिल केकेआर वि. चेन्नई सायं. 7.30 मुंबई
22 एप्रिल बेंगळूर वि. राजस्थान सायं. 7.30 मुंबई
23 एप्रिल पंजाब वि. मुंबई सायं. 7.30 चेन्नई
24 एप्रिल राजस्थान वि. केकेआर सायं. 7.30 मुंबई
25 एप्रिल चेन्नई वि. बेंगळूर दुपारी 3.30 मुंबई
हैदराबाद वि. दिल्ली सायं. 7.30 चेन्नई
26 एप्रिल पंजाब वि. केकेआर सायं. 7.30 अहमदाबाद
27 एप्रिल दिल्ली वि. बेंगळूर सायं. 7.30 अहमदाबाद
28 एप्रिल चेन्नई वि. हैदराबाद सायं. 7.30 दिल्ली
29 एप्रिल मुंबई वि. राजस्थान दुपारी 3.30 दिल्ली
दिल्ली वि. केकेआर सायं. 7.30 अहमदाबाद
30 एप्रिल पंजाब वि. बेंगळूर सायं. 7.30 अहमदाबाद
1 मे मुंबई वि. चेन्नई सायं. 7.30 दिल्ली
2 मे राजस्थान वि. हैदराबाद दुपारी 3.30 दिल्ली
पंजाब वि. दिल्ली सायं. 7.30 अहमदाबाद
3 मे केकेआर वि. बेंगळूर सायं. 7.30 अहमदाबाद
4 मे हैदराबाद वि. मुंबइं सायं. 7.30 दिल्ली
5 मे राजस्थान वि. चेन्नई सायं. 7.30 दिल्ली
6 मे बेंगळूर वि. पंजाब सायं. 7.30 अहमदाबाद
7 मे हैदराबाद वि. चेन्नई सायं. 7.30 दिल्ली
8 मे केकेआर वि. दिल्ली दुपारी 3.30 अहमदाबाद
राजस्थान वि. मुंबई सायं. 7.30 दिल्ली
9 मे चेन्नई वि. पंजाब दुपारी 3.30 बेंगळूर
बेंगळूर वि. हैदराबाद सायं. 7.30 कोलकाता
10 मे मुंबई वि. केकेआर सायं. 7.30 बेंगळूर
11 मे दिल्ली वि. राजस्थान सायं. 7.30 कोलकाता
12 मे चेन्नई वि. केकेआर सायं. 7.30 बेंगळूर
13 मे मुंबई वि. पंजाब दुपारी 3.30 बेंगळूर
हैदराबाद वि. राजस्थान सायं. 7.30 कोलकाता
14 मे बेंगळूर वि. दिल्ली सायं. 7.30 कोलकाता
15 मे कोलकाता वि. पंजाब सायं. 7.30 बेंगळूर
16 मे राजस्थान वि. बेंगळूर दुपारी 3.30 कोलकाता
चेन्नई वि. मुंबई सायं. 7.30 बेंगळूर
17 मे दिल्ली वि. हैदराबाद सायं. 7.30 कोलकाता
18 मे केकेआर वि. राजस्थान सायं. 7.30 कोलकाता
19 मे हैदराबाद वि. पंजाब सायं. 7.30 बेंगळूर
20 मे बेंगळूर वि. मुंबई सायं. 7.30 कोलकाता
21 मे केकेआर वि. हैदराबाद दुपारी 3.30 बेंगळूर
दिल्ली वि. चेन्नई सायं. 7.30 कोलकाता
22 मे पंजाब वि. राजस्थान सायं. 7.30 बेंगळूर
23 मे मुंबई वि. दिल्ली दुपारी 3.30 कोलकाता
बेंगळूर वि. चेन्नई सायं. 7.30 कोलकाता
25 मे क्वालिफायर 1 सायं. 7.30 अहमदाबाद
26 मे एलिमिनेटर सायं. 7.30 अहमदाबाद
28 मे क्वालिफायर 2 सायं. 7.30 अहमदाबाद 30 म
30 मे अंतिम लढत सायं. 7.30 अहमदाबाद