मुंबई : डावखुरा वेगवान गोलंदाज अर्जुन तेंडुलकर याची मुंबई रणजी संघात पहिल्यांदाच वर्णी लागली असून महाराष्ट्र व दिल्ली संघाविरुद्ध होणाऱया पहिल्या दोन लढतीसाठी निवड समितीने त्याला मुंबई संघात स्थान दिले आहे.
महाराष्ट्रविरुद्धची लढत 13 जानेवारीस तर दिल्लीविरुद्धची लढत 20 जानेवारीस होणार आहे. या लढतीसाठी 20 सदस्यीय संघाची घोषणा केली असून सलामीवीर पृथ्वी शॉकडे कर्णधारपदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
गेल्या मार्चमध्ये त्याच्या नेतृत्वाखाली मुंबईने विजय हजारे करंडक पटकावला होता. 22 वर्षीय अर्जुनला जादा खेळाडू म्हणून जानेवारीत झालेल्या मुश्ताक अली करंडक स्पर्धेसाठी सर्वप्रथम मुंबई संघात निवडण्यात आले होते.
मुंबई संघ : पृथ्वी शॉ (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, अरमान जाफर, आकर्षित गोमेल, सचिन यादव, आदित्य तरे, हार्दिक तमोरे, शिवम दुबे, अमन खान, शशांक आतार्डे, अर्जुन तेंडुलकर, रॉयस्टन डायस, सिद्धार्थ राऊत, धवन कुलकर्णी, शम्स मुलानी, तनुष कोटियन, मोहित अवस्थी, सर्फराज खान, प्रिन्स बदियानी, प्रशांत सोळंकी.