ऑनलाईन टीम / मुंबई :
मुंबईतील वरळी भागात असलेल्या जुन्या पासपोर्ट कार्यालयाच्या इमारतीत स्फोट झाल्याची माहिती समोर येत आहे. या स्फोटात इमारतीचा काही भाग कोसळला आहे.
प्राथमिक माहितनुसार, मनीष कमर्शियल सेंटर इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरील केमिकल लॅबमध्ये हा स्फोट झाला आहे. हा स्फोट सिलेंडर ब्लास्टमुळे सकाळी पावणे नऊ च्या दरम्यान झाला. हे ऑफिस बंद असल्यामुळे कोणतीही जीवितहानी झालेली नाही आहे.
मात्र, एक महिला या स्फोटात किरकोळ जखमी झाली आहे. दरम्यान, घटनास्थळी अग्निशमन दलाची गाडी पोहचली असून बचाव कार्य सुरू आहे.