वृत्तसंस्था/ मुंबई
10 जानेवारीपासून सुरू होणाऱया सय्यद मुश्ताक अली चषक टी-20 लीग स्पर्धेसाठी मुंबई संघाची घोषणा करण्यात आली. भारताचा माजी जागतिक दर्जाचा फलंदाज सचिन तेंडुलकर याचा चिरंजीव अर्जुनचा मुंबई संघात समावेश करण्यात आला आहे.
या स्पर्धेसाठी लीग टप्प्यापर्यंत मुंबई संघाची घोषणा शनिवारी करण्यात आली. या स्पर्धेत मुंबई संघाचा इ गटात समावेश असून दिल्ली, हरियाणा, केरळ, आध्र आणि पाँडेचेरी यांचाही या गटात सहभाग आहे. मुंबई संघाचे लीग गटातील सामने 11, 13, 15, 17 आणि 19 जानेवारीला खेळविले जाणार आहेत. या स्पर्धेची बाद फेरी अहमदाबादमध्ये आयोजित केली आहे. अर्जुन तेंडुलकरने यापूर्वी भारताच्या 19 वर्षांखालील वयोगटाच्या संघात स्थान मिळविले होते. या स्पर्धेसाठी श्रेयस अय्यरची मुंबई संघाला उणीव भासेल. सुर्यकुमार यादवकडे मुंबई संघाचे नेतृत्व सोपविण्यात आले असून आदित्त्य तरे उपकर्णधार आहे.
मुंबई संघ- सुर्यकुमार यादव (कर्णधार), आदित्त्य तरे (उपकर्णधार), जस्वाल, गोमेल, सर्फराज खान, सिद्धेश लाड, शिवम तुबे, शुभम रांजणे, सुजित नायक, साईराज पाटील, तुषार देशपांडे, धवल कुलकर्णी, मिनाद मांजरेकर, प्रथमेश डाके, अर्थव अंकोलेकर, शशांक अत्रादे, मुलानी, हार्दिक तेमोरे, आकाश पारकर, एस शेख, अर्जुन तेंडुलकर आणि कृतिक हंगवडी.