एसटी बस प्रशासनाचा निर्णय-पाच शिवशाही बसला आग
प्रतिनिधी/ सातारा
सातारा एसटी स्टॅड वरील भाडे तत्वावर असलेल्या पाच शिवशाही बस आगीत जळून खाक झाल्या. या प्रकरणी मुकबधिर मुलांवर गुन्हा दाखल करण्यात आला. हा गुन्हा मागे घेण्यासाठी पोलीस लवकरच अहवाल पाठविणार आहेत. यांची प्रक्रियाही सुरू झाली आहे.
काही दिवसापूर्वी सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास सातारा बस स्टॅड मधील शिवशाही बसला आग लागली होती. यामध्ये 5 शिवशाही बस जळाल्याने 1 कोटीचे नुकसान झाले. या शिवशाही भाडेतत्वावरील होत्या. या घटनेच्या दिवशी मूकबधिर मुलांला ताब्यात घेण्यात आले. त्याच्यावर गुन्हा ही दाखल करण्यात आला. पोलीसांनी त्या मुलाला चौकशीसाठी ताब्यात घेतल्यानंतर दुभाषकाद्वारे त्याचा जबाब घेतला. दोन युवक बसमध्ये सिगारेट ओढत होते. त्या मुलांनीच आग लावली. गाडीत धुर दिसू लागल्यानंतर मी पळत गाडीतून बाहेर आलो, असा जबाब त्या मुलाने पोलीसांना दिला.
यामुळे पोलीसांचाही नाईलाज झाला आहे. शिवशाहीच्या मॅनेजरच्या तक्रारीनुसार या संबंधित मूकबधित मुलावर गुन्हा दाखल झाला आहे. इतर संशयित आरोपीप्रमाणे त्यांच्याकडे धड चौकशीही करता येईना, त्यामुळे पोलीस हतबल झाले आहेत. त्या दोन युवकांना पोलीसांना शोधावे लागणार आहे. तत्पूर्वी मूकबधिर मुलांवर दाखल असलेला गुन्हा मागे घेण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. यामुळे आग कोणी लावली यांचे गुढ अद्याप कायम आहे.