ऑनलाईन टीम / मुंबई :
फेसबुक- जिओ करारानंतर उद्योगपती मुकेश अंबानी आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनले आहेत. फेसबुकने डिजिटल मार्केटमध्ये एन्ट्री करत रिलायन्स जिओमध्ये 5.7 बिलियन म्हणजे 43,574 कोटी रुपयांची गुंतवणूक केली. त्यानंतर मुकेश अंबानी यांनी संपत्तीच्या बाबतीत चीनमधील अलिबाबाचे संस्थापक जॅक मा यांना मागे टाकले.
लॉकडाऊन काळात उद्योगधंदे ठप्प असल्याने मुकेश अंबानी यांच्या संपत्तीत 14 अरब डॉलर्सनी घट झाली होती. तर अरब डॉल संपत्तीत 1 अरब डॉलर्सने घट झाली होती.मंगळवारी मुकेश अंबानी यांच्या संपत्तीत 4 अरब डॉलर्सची वाढ होऊन ती आता 49 अरब डॉलर्स एवढी झाली आहे. चीनच्या जॅक मा यांच्या संपत्तीपेक्षा 3 अरब डॉलर्सनी मुकेश अंबानी यांची संपत्ती जास्त आहे.
भारतातील सर्वात मोठी टेलिकॉम कंपनी रिलायन्स Jio मधील 9.99 टक्के हिस्सा फेसबुकने 43, 574 कोटी रुपयांना खरेदी केला आहे. या कारारानंतर रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडच्या शेअरमध्ये चांगली वाढ झाली आहे.