श्रीनगर
पीपल्स डेमोक्रेटिक पार्टीच्या युवा शाखेचे अध्यक्ष वाहिद पारा यांना जामिनावर झालेल्या सुटकेच्या काही वेळातच पुन्हा अटक करण्यात आली आहे. दहशतवादाला वित्तपुरवठा केल्याप्रकरणी एनआयएच्या विशेष न्यायालयाने पारा यांना जामीन मंजूर केला होता. परंतु त्यानंतर काउंटर इंटेलिजेन्स काश्मीरने (सीआयके) पारा यांना अटक केली आहे. पीडीपी प्रमुख मेहबूबा मुफ्ती यांनी याप्रकरणी उपराज्यपाल मनोज सिन्हा यांना हस्तक्षेप करण्याचे आवाहन केले आहे. हिजबुल मुजाहिदीनला मदत केल्याप्रकरणी पारा याला 25 नोव्हेंबर रोजी अटक करण्यात आली होती.