ऑनलाईन टीम / डेहराडून :
उत्तराखंडचे मुख्यमंत्री त्रिवेंद्रसिंह रावत यांनी भाजपा पक्षश्रेष्ठींच्या नाराजीनंतर मंगळवारी राजीनामा दिला. त्यानंतर रावत यांची जागा कोण घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले असतानाच महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यासह रावत यांच्या मंत्रिमंडळात असलेले धनसिंह रावत, लोकसभा खासदार अजय भट्ट आणि राज्यसभा खासदार अनिल बलूनी यांची नावे समोर आली आहेत.
कोश्यारी यांनी यापूर्वी उत्तराखंडचे नेतृत्व केले आहे. तेथील भाजपचे महत्वाचे नेते आणि कार्यकर्ते यांच्याशी त्यांचे चांगले संबंध आहेत. भाजपा पक्षश्रेष्ठीच्या नाराजीमुळेच रावत यांना मुख्यमंत्री पदावरून पायउतार व्हावे लागले. त्यामुळे रावत यांच्या राजीनाम्यामागे कोश्यारी यांचाच हात असल्याची चर्चा उत्तराखंडच्या राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.