बेंगळूर/प्रतिनिधी
आजपासून बेंगळूरच्या रस्त्यावर इलेक्ट्रिक बस धावणार आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा आणि उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी यांनी बुधवारी शहरातील इलेक्ट्रिक बस रस्त्यावर धावण्यापूर्वी तिची पाहणी केली. दरम्यान परिवहन विभागाचे प्रभारी सवदी यांनी शांतीनगर बस डेपो येथून विधान सौधकडे जाण्यासाठी बस सोडली असता यावेळी बेंगळूर महानगर परिवहन महामंडळाचे (बीएमटीसी) व इतर संबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी त्यांच्यासमवेत आले.
हा प्रयोग यशस्वी ठरल्यास बीएमटीसीने केंद्राच्या फेम २ योजनेंतर्गत शहरात ३०० ई-बस भाड्याने देण्याची आणि चालविण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे.