पोफळीत बंदोबस्तासाठी 200 पोलिसांसह 25 अधिकारी
प्रतिनिधी / चिपळूण
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे गुरुवारी 10 डिसेंबर रोजी सातारा, रत्नागिरी व पुणे जिह्यांचा दौरा करणार आहेत. या दौऱयात ते सकाळी 10.50 वाजता कोयनेच्या पोफळी जलविद्युत प्रकल्पाची पाहणी करणार आहेत. या दौऱयानिमित्ताने 25 अधिकाऱयांसह तब्बल 200 पोलीस पोफळी परिसरात बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आले आहेत.
गुरूवारी सकाळी 10 वाजता मुख्यमंत्र्यांचे कोयनानगर येथील हेलिपॅडवर आगमन झाल्यानंतर ते मोटारीने पोफळी जलविद्युत प्रकल्पाकडे जाणार आहेत. सकाळी 10.50 वाजता पोफळी जलविद्युत प्रकल्पाच्या कोयना टप्पा-4 विद्युतगृहाची पाहणी करून 11.20 वाजता ते कोयना धरणाकडे प्रयाण करणार आहेत. दुपारी 12.05 वाजता ते कोयना धरण परिसराची पाहणी करणार आहेत. मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर ठाकरे प्रथमच चिपळुणात येणार आहेत. मुखमंत्र्यांचा अधिकृत दौरा बुधवारी सायंकाळी जाहीर झाला.
वरिष्ठ अधिकारी तळ ठोकून
मुख्यमंत्र्याच्या दौऱयासाठी प्रकल्प परिसरासह पोफळी भागात सर्वत्र पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. जिल्हाभरातून तब्बल 200 पोलिसांसह वरीष्ठ अधिकारी दाखल झाले आहेत. जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा, पोलीस अधीक्षक डॉ. मोहितकुमार गर्ग यांच्यासह वरीष्ठ अधिकाऱयांनी पोफळीत दाखल होत सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेतला.
अन् धास्तावलेल्या यंत्रणांचा सुस्कारा…!
मुख्यमंत्री चिपळुणात येणार असल्याने प्रशासकीय यंत्रणा हडबडून केली होती. कोयनानगर अथवा चिपळुणात उतरल्यानंतर मोटारीने पोफळीकडे जायचे म्हटल्यास रस्ते योग्य नसल्याने महामार्गासह बांधकाम विभाग विशेष काळजीत होता. शहरातील रस्तेही खड्डेमय असल्याने नगर परिषदही अधिकृत दौऱयाची वाट पाहत होती. बुधवारी सायंकाळी अधिकृत दौरा जाहीर होऊन ते कोयनानगरहून थेट पोफळीला येणार असल्याचे कळल्यानंतर धास्तावलेल्या यंत्रणांनी सुटकेचा निश्वास टाकला.