बेंगळूर/प्रतिनिधी
कर्नाटक राज्यात कोरोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. परस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रशासन योग्य त्या खबरदारीच्या उपाययोजना राबवत आहे. याच पार्शवभूमीवर मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा आज कोरोना परिस्थितीचा आढावा घेणार असून राज्यातील परिस्थिती नियंत्रणात आणण्यासंदर्भात चर्चा करण्यासाठी राज्यमंत्री, खासदार, आमदार आणि बेंगळुरूतील नगरसेवकांची भेट घेऊन बैठक घेणार आहेत. मुख्यमंत्री कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार ही बैठक पॅलेस मैदानावर होणार असल्याचे सांगितले आहे.