ऑनलाईन टीम / मुंबई :
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज संध्याकाळी 7.30 वाजता राजभवनावर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेणार आहेत. विधान परिषदेच्या राज्यपालनियुक्त 12 आमदारांच्या रखडलेल्या नियुक्तीसंदर्भात ही भेट होणार आहे.
राज्यपालांच्या भेटीला मुख्यमंत्री ठाकरे यांच्यासह उपमुख्यमंत्री अजित पवार आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात हे देखील असणार आहेत. आठ महिने उलटले तरीही विधान परिषदेच्या राज्यपालनियुक्त 12 आमदारांच्या नियुक्तीबाबत कोश्यारी यांनी कोणताही निर्णय घेतला नाही. याच मुद्दयावर चर्चा करण्यासाठी महाविकास आघाडीचे हे दिग्गज राज्यपालांना भेटणार आहेत. या भेटीतून तरी यावर तोडगा निघणार का? याकडे महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.