ऑनलाईन टीम / मुंबई :
शासकीय तारखेनुसार 19 फेब्रुवारीला शिवजयंती साजरी केली जाते. मात्र, गेले अनेक वर्ष शिवसेनेकडून तिथीनुसार शिवजयंती साजरी करत आहे. आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे शिवजयंती शासकीय तारखेनुसार शिवजयंती साजरी करतील अशी माहिती राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी दिली.
परब म्हणाले, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे शासकीय शिवजयंती साजरी करतील मात्र, शिवसेना तिथीप्रमाणे शिवजयंती करणार आहे
तसेच शिवजयंती एकच साजरी व्हावी हा वाद होता, त्याबाबत सरकार एक समिती स्थापन करणार आहे. त्यानंतर शिवजयंती बाबत निर्णय होईल, असंही अनिल परब यांनी सांगितलं.