मुंबई\ ऑनलाईन टीम
मराठा आरक्षणाचा तिढा सोडवण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. या भेटीचे फोटो अनेकांनी सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. अनेकांनी या फोटोला विविध कॅप्शन दिल्या आहेत. मात्र सध्या राष्ट्रवादीचे नेते आमदार रोहित पवार यांनी दिलेल फोटो कॅप्शनची सोशल मीडियावर चर्चा आहे. रोहित पवार यांची ही भन्नाट फोटो कॅप्शन अनेकांना आवडली आहे. तसेच सोशल मीडियावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी परिधान केलेल्या सूटची म्हणजे नवीन लूकची देखील जोरदार चर्चा रंगली आहे.
रोहित पवार यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आजच्या भेटीचा फोटो शेअर करत, ‘लोकशाहीचं सौदर्य’ असं कॅप्शन दिलं आहे. रोहित पवार यांची ही फोटो कॅप्शन नेटकऱ्यांना भलतीच आवडली आहे. अनेकांनी यावर कमेंट करुन आपलं मत व्यक्त केलं आहे.
आज दिवसभर सोशल मीडियावर ख्यमंत्री उद्धव ठाकरे व नरेंद्र मोदी यांच्या भेटीची चर्चा रंगलेली आहे. या भेटीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या भेटीची सोशल मीडियावर आणखी एका कारणामुळे चर्चा रंगली आहे ती म्हणजे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी परिधान केलेल्या सूटची, म्हणजेच त्यांच्या कपड्याची, त्यांचा हा अंदाज नेटकऱ्यांना चांगलाच आवडला आहे. बऱ्याच दिवसांनी अजित पवारांचा हा नवीन लूक पाहायला मिळाला आहे.