सुदिन ढवळीकर यांनी दिली माहिती
प्रतिनिधी /पणजी
मगो आणि तृणमूलची युती मजबुत असून कुणीही विनाकारण अफवा पसरविण्याचा प्रयत्न करू नये असे मगोचे जेष्ठ आमदार सुदिन ढवळीकर यांनी सांगितले. 2022 मध्ये युतीचेच सरकार येणार यात शंकाच नाही. मगो तृणमूल युतीचा मुख्यमंत्री येत्या दोन दिवसात निश्चित होणार आहे. मगोप आणि तृणमूल एकत्रीपणे हा निणर्य घेतील. जाहीरनाम्यावरील फोटो पाहिल्यायस मुख्यमंत्री कोण हे तुमच्या लक्षात आलेच असेल असे सांगताना ढवळीकर यांनी युतीचा मुख्यमंत्री आपणच असल्याचे अप्रत्यक्षपणे स्पष्ट केले आहे.
पणजीत घेतलेल्या पत्राकारपरिषदेत सुदिन ढवळीकर बोलत होते. यावेळी त्यांच्या सोबत मगोचे कार्यकारी अध्यक्ष प्रताप फडते, ताळगाव मतदार संघाच्या मगो उमेदवार शुभांगी सावंत उपस्थित होत्या. मगो तृणमूल युती तर्फे 39 उमेदवार रिंगणात असून त्यातील 13 उमेदवार मगोचे आहेत. दरवेळी मगोने नवे चेहरे आणि सुशिक्षित उमेदवार दिले असून यावेळीही ताच कित्ता गिरविला आहे. ताळगाव मतदार संघात शुभांगी सावंत या युवतीला उमेदवारी उमेदवारी दिली असून ती सुशिक्षित आहे असेही ढवळीकर यांनी सांगितले.
भाजपकडे युती करणार नाही
निवडणुकीनंतरही भाजपकडे युती करणार नाही असे ढवळीकर यांनी स्पष्ट केले आहे. 2017 साली मनोहर पर्रीकर यांना मुख्यमंत्री करण्याच्या अटीवरच आम्ही भाजपला पाठींबा दिला होता. भाजपने मुख्यमंत्री पदाचा चेहरा म्हणून अप्रत्यक्षपणे डॉ. प्रमोद सावंत यांचे नाव पुढे केले आहे. प्रमोद सावंत यांना आम्ही कधीच पाठींबा देणार नाही. असेही ढवळीकर पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना सांगितले.
वाहतूक खात्याच महसूल 270 कोटीवर कसा आला
भाजप समृध्दीच्या गोष्टी करीत आहेत मात्र आज राज्यात जे काही चालले आहे ते पहाता ही समृध्दी नसून चोरीचा धंदा आहे. या सरकारने नोकऱया विकल्या अनेक अपव्यवहार केले. पराभव समोर दिसत असल्याने भाजपचे मंत्री मगोवर टीका करीत आहेत. ज्याच्यांवर जमीन घोटाळ्याची तक्रार नेंद असून प्रकरण न्यायालयात आहेय त्याला दुसऱयावर टीका करण्याचा कोणताही अधिकार नाही. आपण वाहतुक मंत्री असताना 470 कोटी रुपये महसूल येत होता आता तो 270 कोटी रुपयांवर कसा पोचला, बाकीचे पैसे जातात कुठे असे प्रश्न ढवळीकर यांनी उपस्थित केले आहेत. मुख्यमंत्री डॉ. सावंत मगो तृणमूलबाबात बेताळ वक्तव्य करीत आहेत. प्रत्यक्षात प्रमोद सावंत यांचे पाय भ्रष्टाचाराच्या दलदलीत अडकले आहेत. जनता त्यांना घराच रस्ता निश्चित दाखणार यात शंकाच नाही. भाजपचे मंत्री मगोबाबत करीत असलेल्या वक्तव्याच आपण निषेध करीत असल्याचे ढवळीककर म्हणाले.
गोमंतकीय जनतेला विकासाचा भुलभलैया दाखविला जात आहे. मात्र प्रत्यक्षात हे प्रकल्प सरकारातील नेत्यांना कमीशन देणारे ठरले आहेत. सत्तेवर येताच सरकारच्या या कारभाराची चौकशी करून त्याचे खरे रुप जनतेसमोर आणू असेही ढवळीकर म्हणाले. निवडणुकीला अवघे काही दिवस बाकी राहिले आहेत. मगो तृणमूल जोरदार प्रचार करणार असून सरकारच्या भानगडी रस्त्यावर आणणार. तृणमूलच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी यांच्यावर टीका करण्याआधी भाजप सरकारातील मंत्री सेक्स स्कँडलमध्ये अडकलेले आहेत त्यांनी क्लिन चिट कशी मिळते हे स्पष्ट करावे असेही ढवळीकर म्हणाले.
मडकई मतदारसंघात प्रचारासाठी आपल्याला फिरायची गरज नाही. तिथे केवळ विरोधकांना फिरावे लागते. मडकईतील मगोचे कार्यकर्ते आणि माझे कुटुंबिय ती जबाबदारी पार पाडत आहेत. माजा विजय म्हणजेच माझ्या मतदारांचा विजय माझ प्रत्येक मतदार विजयी होण्यासाठी खंबीरपणे तयारी करीत आहे त्यमुळे आपल्याला फिरावे लागत नाही. भाजपचे केंद्रीयमंत्री गोव्यात येतात आणि केवळ फोंडा तालुक्यातील मतदार संघात सभा घेतात याच्यावरूनच स्पष्ट होते की फोंडा तालुक्यातील मगोचे सर्व उमेदवार निश्चित निवडून येणारच याचा प्रत्येय भाजपलाही आला आहे म्हणूनच ते मगोबाबत बेताळ वक्तव्य करीत सुटले आहेत. असेही ढवळीकर म्हणाले.
मगो रोमी कोकणीला मान्यता देणार नाही
मगो जाहीयुतीचे सरकार सत्तेत आल्यास रोमी कोकणीतून राज्याचा कारभार चालविणार काय असा प्रश्न विचारले असता ढवळीकर म्हणाले की रोमी कोकणीचा पुळका तृणमूलमधील काही ठरावीक नेत्यांना आहे. पण जाहिरनाम्यात आम्ही तसे स्पष्ट केलेले नाही. सरकार सत्तेवर आल्यानंतर त्याचा विचार होईल त्यासाठी योग्य ते सोपस्कर पूर्ण करावे लागतील मात्र मगो रोमन कोकणीला मान्यता देणार नाही असे ढवळीकर यांनी स्पष्ट केले आहे.