बेंगळूर/प्रतिनिधी
कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्माई आपल्या कार्यकाळातील दुसर्या दिवशी गुरुवारी राज्यातील पूर बाधित भागाला भेट देणार आहेत. मुख्यमंत्री येल्लापूर, कारवार आणि अंकोला येथे भेट देणार आहेत. राज्यात काही ठिकाणी झालेल्या मुसळधार पावसामुळे पूर आला यामुळे झालेल्या नुकसानीचा ते आढावा घेणार आहेत. दरम्यान दौऱ्यावर जाण्यापूर्वी मुख्यमंत्र्यांनी येडियुराप्पांची भेट घेतली.
दरम्यान, मुख्यमंत्री बसवराज बोम्मई आज उत्तर कन्नड जिल्ह्यातील पूरग्रस्त भागाची पाहणी करणार आहेत. दुरुस्ती व मदतकार्य युद्धपातळीवर केलं जाईल, असे ते म्हणतात. आज पूर-बाधित जिल्ह्याच्या दौऱ्यापूर्वी त्यांनी बेंगळूरमध्ये माजी मुख्यमंत्री बी. एस. येडीयुरप्पा यांची भेट घेतली.