बेंगळूर/प्रतिनिधी
राज्याच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्याच्या दोन दिवसानंतर बसवराज बोम्माई नवी दिल्लीला गेले आहेत. ते पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इतर नेत्यांची भेट घेणार आहेत. घेणार आहेत. राज्याच्या मुख्यमंत्रीपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर त्यांचा हा राष्ट्रीय राजधानीला पहिला दौरा आहे.
मुख्यमंत्री दिल्लीला पोहचल्यानांतर त्यांनी प्रथम संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची भेट घेतली. यांनतर ते अन्य नेत्यांची भेट घेणार आहेत. मुख्यमंत्री बोम्माई दोन दिवसांच्या राष्ट्रीय राजधानीच्या दौऱ्यावर आहेत.