बेंगळूर/प्रतिनिधी
कर्नाटकचे मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांनी हातमाग विणकरांची ‘नेकर सन्मान योजना’ सुरु केली आहे. सोमवारी पहिल्या टप्प्यात १९,७४४ हातमाग विणकरांच्या बँक खात्यात थेट २ हजार रुपयांची आर्थिक मदत हस्तांतरित करून ‘नेकर सन्मान योजना’ सुरू केल्याची माहिती मुख्यमंत्री येडियुरप्पा यांनी दिली.
चौथ्या राष्ट्रीय हातमाग जनगणनेनुसार कर्नाटक राज्यात ५४७८९ नोंदणीकृत हातमाग विणकर आहेत. येडियुरप्पा म्हणाले की, “कर्नाटकमधील सेवा सिंधू सॉफ्टवेअर अंतर्गत सुमारे 40,634 हातमाग विणकरांनी नाव नोंदणी केली आहे. आतापर्यंत तब्बल, ३७३१४ विणकरांच्या अर्जांची छाननी करण्यात आली असून त्याला मान्यता देण्यात आली असल्याचे मुख्यमंत्री येडियुरप्पा म्हणाले.