बेंगळूर/प्रतिनिधी
राज्यात मंगळवारी रात्रीपासून ‘क्लोज डाऊन’ला सुरुवात झाली आहे. राज्याचे मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांनी गुरुवारी आपल्या राज्य मंत्रिमंडळाच्या सदस्यांची आणि उच्च अधिकाऱ्यांची बैठक घेऊन कोविड -१९ चा प्रसार कमी करण्याच्या सरकारच्या कामगिरीच्या प्रगतीचा आढावा घेतला.
बेंगळूर येथे झालेल्या बैठकीत, उपमुख्यमंत्री गोविंद कारजोळ, उपमुख्यमंत्री सी.एन. अश्वथनारायण, गृह व कायदा मंत्री बसवराज बोम्माई, आरोग्य व वैद्यकीय शिक्षणमंत्री के. सुधाकर, महसूलमंत्री आर. अशोक, नगरविकास मंत्री बसवराज, मुख्य सचिव पी. रविकुमार आणि एसीएस (आरोग्य) जावेद अख्तर आदी उपस्थित होते.