बेंगळूर/प्रतिनिधी
राज्याचे मुख्यमंत्री बी. एस. येडियुराप्पा दोन दिवसांच्या दिल्ली दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी पक्षातील वरिष्ठ नेत्यांची भेट घेतली. दिल्लीला रवाना झाल्यांनतर मुख्यमंत्री बीएस येडियुरप्पा मुख्यमंत्रीपदाचा लवकरच राजीनामा देणार आहेत. वय आणि आरोग्याच्या तक्रारी आदी कारणांमुळे ते पदाचा राजीनामा देणार असल्याचं बोललं जात होतं. मात्र, येडियुरप्पा यांनी हे वृत्त फेटाळून लावलं आहे. आपल्या राजीनाम्याचं वृत्त निराधार असून त्यात काहीच तथ्य नाही, असं येडियुरप्पा यांनी म्हटलं आहे. दरम्यान, आज येडियुरप्पा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पक्षाध्यक्ष जे.पी नड्डा यांची भेट घेतली आहे.
मुख्यमंत्री येडियुरप्पा पदाचा राजीनामा देणार असल्याचं वृत्त एबीपी न्यूजने दिलं आहे. वाढते वय आणि त्यामुळे निर्माण झालेल्या आरोग्याच्या समस्या यामुळे येडियुरप्पा अधिककाळ मुख्यमंत्रीपदी राहणं शक्य नाही. त्यांनी शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन आरोग्याचं कारण पुढं करत राजीनामा देण्याची तयारी दाखवली होती. आज त्यांनी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांची भेट घेतली. त्यांच्याकडेही येडियुरप्पा यांनी राजीनामा देण्याची तयारी दाखवली. तेव्हा, लवकरच कर्नाटकाच्या पुढच्या मुख्यमंत्र्याबाबत पक्ष लवकरच निर्णय घेईल, असं आश्वासन नड्डा यांनी येडियुरप्पा यांना दिलं आहे. लवकरच कर्नाटकातील भाजपच्या सर्व आमदारांची बैठक बोलावली जाईल. तोपर्यंत येडियुरप्पा हेच मुख्यमंत्री राहणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं, असल्याचं म्हंटल होत. पण मुख्यमंत्री येडियुरप्पा यांनी राजीनाम्याचे वृत्त फेटाळून लावले आहे.