बेंगळूर/प्रतिनिधी
कर्नाटकात कोरोना बाधितांची संख्या झपाट्याने वाढत आहे. या पार्शवभूमीवर केंद्रीय पथकाने देखील बंगळूरला येऊन मुख्यमंत्री येडियुरप्पा यांची भेट घेऊन कोरोना परिस्थितीचा आढावा घेतला होता. यावेळी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने कर्नाटक सरकारला कोरोना बाधित व्यक्तींचे जीव वाचविण्याबरोबरच जास्तीत जास्त नागरिकांच्या चाचण्या करण्यावर भर देण्याच्या सूचना केल्या होत्या. याच पार्शवभूमीवर मुख्यमंत्री येडियुरप्पा यांनी बुधवारी कोरोना परिस्थितीचा आढावा आणि उपाययोजनासंदर्भात अधिकारी आणि मंत्र्यांची तातडीने बैठक घेतली.
या बैठकीला उपमुख्यमंत्री अश्वथनारायण सी. एन, वैद्यकीय शिक्षणमंत्री के.सुधाकर, मुख्य सचिव टी. एम. विजय भास्कर आणि बीबीएमपी आयुक्त बी. एच. अनिल कुमार उपस्थित होते.