बेंगळूर/प्रतिनिधी
कर्नाटकचे मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांनी शुक्रवारी महात्मा गांधी आणि लाल बहादूर शास्त्री यांना त्यांच्या जयंतीनिमित्त आदरांजली वाहिली.
बेंगळूरमधील विधान सौध आवारात महात्मा गांधी आणि लाल बहादूर शास्त्री यांच्या पुतळ्यांना येडियुरप्पा यांनी पुष्प अर्पण करून आदरांजली वाहिली.