अधिकाऱयांची घेणार बैठक
प्रतिनिधी /बेळगाव
मुख्यमंत्री बसवराज बोम्मई हे शनिवार दि. 21 ऑगस्ट रोजी बेळगाव दौऱयावर येणार आहेत. मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर त्यांचा हा पहिलाच बेळगाव दौरा आहे.
शनिवारी सकाळी हेलिकॉप्टरने मुख्यमंत्री आलमट्टीला जाणार आहेत. सकाळी 11 वाजता बसवराज बोम्मई यांच्या हस्ते आलमट्टी येथे गंगापूजन होणार आहे. त्यानंतर हेलिकॉप्टरने दुपारी 2 वाजता सुवर्णविधानसौध परिसरातील हेलिपॅडला येणार आहेत. 2.30 वाजता कोरोना व पूरनियंत्रणासंबंधी अधिकारी व लोकप्रतिनिधींच्या बैठकीत भाग घेणार आहेत. सायंकाळी 7.20 वाजता विमानाने ते बेंगळूरला रवाना होणार आहेत.