बेंगळूर : अपेक्स बँकेने मुख्यमंत्री साहाय्यता निधीसाठी 5 कोटी रुपयांची मदत दिली आहे. सहकारमंत्री एस. टी. सोमशेखर आणि अपेक्स बँकेचे अध्यक्ष तथा आमदार बेळ्ळी प्रकाश यांनी मुख्यमंत्री येडियुराप्पा यांची बुधवारी भेट घेऊन 5 कोटी रुपयांचा धनादेश दिला. याप्रसंगी अपेक्स बँकेच्या वतीने 1 लाख एन-95 मास्क मुख्यमंत्र्यांकडे हस्तांतर करण्यात आले.
याप्रसंगी बोलताना सहकारमंत्री एस. टी. सोमशेखर म्हणाले, कोरोनाच्या दुसऱया लाटेचा गंभीर परिणाम होत असून त्याविरोधात लढणे सरकारला आव्हानात्मक ठरत आहे. कोरोनाविरुद्धच्या लढय़ात सहकारी संस्था सरकारला मदत करण्यासाठी पुढे येत असल्याची बाब अभिमानास्पद आहे. मुख्यमंत्री साहाय्यता निधीसाठी सहकारी संस्था, कंपन्यांनी उदार मनाने मदत दिली तर कोरोनाविरुद्ध आणखी परिणामकारीपणे लढा देणे शक्य होणार आहे. याप्रसंगी अपेक्स बँकेचे अध्यक्ष आमदार बेळ्ळी प्रकाश, सहकार विक्री मंडळाचे अध्यक्ष राजेंद्रकुमार, अपेक्स बँकेचे व्यवस्थापकीय संचालक सी. एन. देवराज उपस्थित होते.