ऑनलाईन टीम / पालघर :
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे खराब हवामानामुळे पालघरला जाऊ शकणार नाहीत. त्यामुळे पालघरमधील नवीन जिल्हाधिकारी इमारतीचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या हस्ते आता ऑनलाईन उद्घाटन होणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह राज्यातील बडय़ा सहा मंत्र्यांच्या उपस्थितीत हा सोहळा नियोजित होता. मात्र ढगाळ हवामानामुळे हेलिकॉप्टर उड्डाण कठीण असल्याने मुख्यमंत्री आता पालघर येथील सोहळय़ात प्रत्यक्ष न जाता ऑनलाईन उपस्थित राहून उद्घाटन करणार आहेत.
शिवसेना नेते आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, कृषी मंत्री दादा भुसे आणि राज्यमंत्री अब्दुल सत्तार हे पालघरमधील या सोहळय़ाला प्रत्यक्ष उपस्थित राहणार आहेत. ढगाळ वातावरणामुळे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांसह अनेक मंत्र्यांचे दौरे रद्द झाले.
- मुसळधार पावसाचा इशारा
भारतीय हवामान खात्याने दिलेल्या इशाऱयानुसार, मुंबई, रायगड, ठाणे, पालघर जिह्यांतील काही भागांत जोरदार पावसाची शक्यता आहे. बहुतांश ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाजही हवामान खात्याने वर्तवला आहे. तर काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्मयता वर्तवण्यात आली आहे.