बेंगळूर/प्रतिनिधी
राज्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. मुख्यमंत्री वारंवार राज्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेत आहेत. दरम्यान मुख्यमंत्री बी.एस. येडियुरप्पा आज मंत्रिमंडळाची बैठक घेणार आहेत. राज्यात १४ दिवसांच्या लॉकडाऊनमध्ये कोरोना साथीचे संकट वाढत असताना मुख्यमंत्र्यांनी आज मंगळवारी संध्याकाळी चार वाजता मंत्रिमंडळाची विशेष बैठक बोलावली आहे. याबैठकीत मुख्यमंत्री राज्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा, उपाययोजना आणि आरोग्य सुविधा याविषयी चर्चा करतील.
यामध्ये मुख्यमंत्री मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्यात ऑक्सिजन व रेमडेसिवीरची कमतरता, रूग्णांना बेडचे वाटप आणि प्रकरणे वाढण्याची कारणे यावर चर्चा होईल. लसीच्या डोसच्या कमतरतेबाबतही बैठकीत चर्चा होण्याची अपेक्षा आहे.