बेंगळूर/प्रतिनिधी
कोविड -१९ चा प्रसार रोखण्यासाठी कर्नाटकात १४-दिवसांच्या लॉकडाऊनला मंगळवारी रात्री सुरुवात झाली आहे. दरम्यान काही तासांनी मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांनी बुधवारी नागरिकांना कोविड संसर्गाची साखळी तोडण्यासाठी कोरोना लॉकडाऊन नियम पाळण्याचे आवाहन केले.
“कोविड विषाणूची साखळी तोडण्यासाठी ४ आठवड्यांच्या कठोर नियमांना लॉकडाऊनला सुरुवात झाली आहे. माझे सर्वांना आवाहन आहे. मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करा, सरकारला सहकार्य करा, घरामध्ये राहा आणि आपत्कालीन परिस्थिती असेल तरच बाहेर पडा.” असे मुख्यमंत्र्यांनी म्हंटले आहे.
मुख्यमंत्री येडियुरप्पा यांनी ट्विट केले की, “एकत्रितपणे आपण सर्वजण कोविड -१९ ला पराभूत करू शकतो. त्यामुळे नागरिकांनी सर्व नियमांचे पालन करणे गरजेचे आहे.