बेंगळूर/प्रतिनिधी
राज्याचे मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांना शुक्रवारी कोरोनाची लागण झाल्याने त्यांना बेंगळूर येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. दरम्यान मुख्यमंत्र्यांवर उपचार सुरु असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे रुग्णालयाने सांगितले आहे.
मुख्यमंत्री बेंगळूर येथील खासगी रूग्णालयात दाखल झालेल्या दिवसापासून त्यांची वैद्यकीयदृष्ट्या तब्बेत स्थिर आहेत, तसेच ते उपचारांना प्रतिसाद देत आहेत. असे रुग्णालयाने म्हंटले आहे.
“मुख्यमंत्री येडियुरप्पा यांची तब्बेत ठीक आहे आणि ते वैद्यकीयदृष्ट्या स्थिर आहेत. ते उपचारांना चांगला प्रतिसाद देत आहे, असे मणिपाल रुग्णालयाने जारी केलेल्या बुलेटिनमध्ये म्हंटले आहे.