मंगळूर /प्रतिनिधी
कर्नाटक कॉंग्रेसचे अध्यक्ष डी. के. शिवकुमार यांनी शनिवारी, मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांनी अजूनही स्थिर प्रशासन चालवत असल्याचा दावा केल्यास ग्रामविकास मंत्री के एस ईश्वरप्पा यांना ताबडतोब मंत्रिपदावरून हटवावे, असे वक्तव्य केलं आहे. केरळमधील विधानसभा निवडणुकांच्या प्रचाराच्या मार्गावर ते मंगळूर विमानतळावर पत्रकारांशी बोलत होते.
शिवकुमार यांनी, येडियुरप्पा मंत्रिमंडळातील एका मंत्र्याने मुख्यमंत्र्यांविरूद्ध राज्यपालांकडे तक्रार केली ही गंभीर बाब आहे, असे म्हंटले आहे. मुख्यमंत्र्यांनी त्यांना ताबडतोब काढून टाकावे किंवा ईश्वरप्पा यांनी राजीनामा स्वेच्छेने सादर करावा, असे ते म्हणाले.
ईश्वरवप्पा यांनी बुधवारी त्यांच्या विभागाच्या कारभारामध्ये थेट हस्तक्षेप केल्याचा आरोप करीत मुख्यमंत्री येडियुरप्पा यांच्या विरोधात राज्यपालांकडे तक्रार केली होती.
शिवकुमार यांनी , जर ईश्वराप्पा यांनी मुख्यमंत्र्यांवरील त्यांच्या अविश्वास विषयी पक्षाच्या नेतृत्वाकडे तकार केली असेल तर ते त्यांचे अंतर्गत बाब मानले जाऊ शकते.