बेंगळूर/प्रतिनिधी
मुख्यमंत्री बी.एस. येडियुरप्पा यांनी केंद्रीय गृहमंत्र्यांशी पूरस्थितीबाबत माहिती देऊन चर्चा केली आहे. त्यांनी कर्नाटकमधील परिस्थितीची माहिती केंद्र सरकारला दिली असून गृहमंत्र्यांनी आवश्यक ते मदतीचे आश्वासन दिले आहे.
मुख्यमंत्री येडियुरप्पा यांनी त्यांचे सरकार मदतकार्यासाठी कटिबद्ध आहे. महसूलमंत्री आर. अशोक यांनी पूरग्रस्त भागाला भेट देण्यास प्रारंभ केला आहे.
कर्नाटकच्या आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने राज्याचे गृहमंत्री बसवराज बोम्मई यांना एकूण पूर परिस्थितीची माहिती दिली आहे.
एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार सप्टेंबर अखेरपर्यंत राज्यात सरासरीच्या 800 मिलिमीटर पाऊस पडतो, तर यावर्षी तो एक हजार मिलीमीटरपर्यंत पोहोचला आहे.