गोवा मुक्तिदिन सोहळ्यास उपस्थित राहण्याचे निमंत्रण
प्रतिनिधी/ पणजी
दिल्ली भेटीवर गेलेले मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी शनिवारी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेतली.
राष्ट्रपती भवनात झालेल्या या भेटीत मुख्यमंत्र्यांनी राष्ट्रपतींना गोवा मुक्तीच्या षष्टय़ब्दी सोहळ्यास उपस्थित राहण्याचे आमंत्रण दिले. त्यानंतर आपल्या ट्विट संदेशात डॉ. सावंत यांनी आपण दिल्लीत राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेतल्याचे सांगितले. यंदा गोवा मुक्तीचा षष्टय़ब्दी वर्धापनदिन असून त्यानिमित्त वर्षभर भरगच्च कार्यक्रम आयोजित करण्याची योजना सरकारने आखली आहे. गोव्यासह संपूर्ण देशभरात हे कार्यक्रम होणार आहेत. त्याद्वारे गोव्याच्या कला-संस्कृतीचा देशात तसेच जगभरात प्रसार व प्रचार करणे हा हेतू सरकारने ठेवला आहे.
दरम्यान, मुख्यमंत्र्यांनी त्यानंतर गोव्यातील खाणीसंदर्भात चर्चा करण्यासाठी केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांची भेट घेतली.